WELCOME TO PTV Marathi Medium Primary Section
भव्य क्रीडांगण
क्रीडांगण हे शाळेच्या वास्तूचे अविभाज्य अंग आहे. क्षेत्रफळ ३४६६ चौ.मी., क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लंगडी, डॉजबॉल, लांब उडी इ. खेळांसाठी सोय व प्रशिक्षण.
सांघिक कवायत, साधन कवायत, क्रीडामहोत्सव, आंतरवर्गीय सामने, टिळक ट्रॉफी इ.चे आयोजन.
एन.सी.सी. कक्षा
एन.सी.सी. विद्यार्थांचे गणवेश ठेवण्यासाठी कपाटे. सैन्यात पराक्रम गाजविलेल्या माजी विद्यार्थांचे फोटो. रायफल्स, नकाशे, तक्ते इ. साहित्य.
उद्वाहकाची सोय
पाच मजली इमारत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी इमारतीच्या दोन्ही बाजूस उद्वाहकाची सोय आहे.
अधिकारी व शिक्षक कक्षा –
विद्यालयाचे सभागृह
सभागृहात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्याने,विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
विद्यालयातील वर्ग
विद्यालयातील वर्गखोल्या प्रशस्त व हवेशीर आहेत.
दृक श्राव्य कक्ष (AV Room)
दृक श्राव्य कक्षाचा उपयोग शिक्षक विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंटच्या माध्यमातून शिकविण्यासाठी करतात.विषयानुरूप C.D./D.V.D. आणि L.C.D. Projector व्दारे मार्गदर्शन केले जाते. तसेच इंटरनेटची सुविधा आहे.
संगणक कक्ष
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी या हेतूने 1984 मध्ये अत्याधुनिक संगणक कक्षाची स्थापना. एका संगणका पासून सुरुवात. आजमितीला वातानुकूलित संगणक कक्षा प्रति विद्यार्थी एक संगणक याप्रमाणे संगणक उपलब्ध असून विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्ययावत शिक्षण दिले जाते. विषयानुरूप C.D./D.V.D. आणि L.C.D. Projector व्दारे मार्गदर्शन केले जाते. तसेच इंटरनेटची सुविधा आहे.
विद्यालयाचे समृद्ध ग्रंथालय
विद्यालयाच्या ग्रंथालयात विविध विषयांची २६००० पेक्षा जास्त पुस्तके आहेत. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथालयातील वाचनसाहित्याचा लाभ घेतात.
अत्याधुनिक प्रयोगशाळा
विद्यालयात विज्ञानाच्या दोन सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. विद्यार्थ्यांना अनेक प्रयोगांची प्रात्यक्षिके येथे पाहण्यास मिळतात.
भूगोल दालन
विद्यार्थ्यांची भूगोल विषयातील रुची वाढविण्यासाठी भूगोल दालनात विविध तक्ते, नकाशे, भौगोलिक साहित्य उपलब्ध आहे.
परिपूर्ण पाक कक्षा
पाकशास्त्रासाठी आवश्यक अशी सामुग्री, गॅस, ओव्हन, मिक्सर, हिटर, Aquaguard ,फ्रीज या आधुनिक सुविधा, फळा, साहित्य ठेवण्यासाठी कपाटे, मांडण्या, भित्तिफलक, एक्झॉस्ट फॅन, हात व भांडी स्वच्छतेसाठी बेसिन्स.
टंकलेखन कक्षा
कार्यानुभव या विषयांतर्गत विद्यार्थांना टंकलेखनया विषयांची ओळख.
व्यायाम शाळा
आपले शरीर सुद्धृढ आणि बळकट करण्यासाठी आपल्या संस्थेने सर्व विद्यार्थी आणि शिकाक्षांसाठी अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिलेली आहे.