WELCOME TO Paranjpe School Marathi Medium Secondary Section
About School
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे परांजपे विद्यालय (माध्यमिक शाळा)
शाळेचा इतिहास:
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे परांजपे विद्यालय अशी ओळख झाली १९७० रोजी.१९७० रोजी १ ली ते ४ थी प्राथमिक शाळेत २००/२५० आणि ५ वी ते १० वी ४५० विद्यार्थी अशी शाळा सुरु झाली.इ.स १९७०-७२ मध्ये ११वीची फक्त एकच तुकडी होती. पुढे त्या वृद्धिंगत होत गेल्या.इ.स १९७३-७४ हे वर्ष तर शाळेला सर्वोच्च यश मिळवून देणारे ठरले.१९७५ हे ११ वी एस.एस.सी चे शेवटचे वर्ष तसेच १० वी शालांत परीक्षेचे पहिलेच वर्ष ठरले.अशाप्रकारे १९७०ते १९७५ या कालखंडात परांजपे विद्यालयाला आपले पाय भक्कम रोवण्यात घालवावे लागले.१९७५ ते आजतागायत परांजपे विद्यालयाची विजयपताका या आसमंतात मोठ्या डौलाने फडकत आहे. सध्या परांजपे विद्यालयात शिकत असलेले एकूण विद्यार्थी ६९० असून एकूण २४ वर्गखोल्या उपलब्ध आहेत.परांजपे विद्यालया तर्फे १० वीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याकरीता विविध विषयांवरीलतज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने वेळोवेळी आयोजित केली जातात.
मुख्याध्यापक :
सस्नेह नमस्कार,
शाळा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र. यासाठीच विविध सर्जनशील उपक्रम राबवण्यासाठी मुख्याध्यापक अर्थात कुटुंबप्रमुख या नात्याने विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासोबत सतत प्रयत्नशील राहणे हे माझे कर्तव्यच आहे. संस्था नवनवीन उपक्रमांसाठी नेहमीच पुढाकार घेते म्हणूनच आम्हाला नवसंजीवनी मिळते.अत्याधुनिक संगणक कक्ष ,दृकश्राव्य कक्ष, प्रयोगशाळा ,व्यायामशाळा ,नाविन्यपूर्ण गणित दालन, सुसज्ज ग्रंथालय खेळायला मोठे क्रीडांगण, प्रशस्त शिक्षक कक्ष व कार्यालय, समुपदेशन कक्ष, पूर्णवेळ उपहारगृह , शुद्ध आणि भरपूर पाणीपुरवठा तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह अशा अनेकविध सोयी सुविधांचा लाभ सर्वाना शाळेत उपलब्ध आहे. एवढच म्हणेन विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा ध्यास.
आपला स्नेहांकित,
श्री. गणपत हाक्के
मुख्याध्यापक, परांजपे विद्यालय ( माध्यमिक विभाग)
शाळेच्या जडणघडणीचे मानकरी :
परांजपे विद्यालयाचे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात आणि ते कायम राखण्यात मोलाचा हातभार लागला तो पुढील मान्यवरांचा.या मान्यवरांत सर्वात अग्रणी नाव घ्यावे लागेल ते माननीय श्रीयुत. पेठे सरांचे. पेठे सर हे परांजपे विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक होते. त्यांचा कार्यकाल १० जून १९७० ते ३० सप्टेंबर १९९० होता. त्यांचे उत्तम नेतृत्व जिद्द व व्यासंगवृत्ती यामुळेच शाळेची मुळे या मातीत घट्ट रोवली गेली.माननीय मुख्याध्यापक श्री. मधुकर पेठे, उपमुख्याध्यापक कै.गणेश पाटील व पर्यवेक्षिका कै. शर्मिला बर्वे या त्रयींनी शाळेची धुरा संभाळली. हि त्रयी म्हणजे शाळेची शान होती.कर्तृत्ववान अधिकारी , विद्वान व निष्ठावान शिक्षक आणि कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी यांचा सुरेख मेळ जमला होता आणि त्याचे फलित म्हणजेच परांजपे विद्यालयाच्या यशाची चढती कमान होय.