Home » Paranjpe School Marathi Medium Secondary Section – Infrastructure

Paranjpe School Marathi Medium Secondary Section – Infrastructure

WELCOME TO Paranjpe School Marathi Medium Secondary Section

वास्तुवैशिष्ट्ये: 

विजयनगर सोसायटीच्या प्रांगणात उभारलेली हि वास्तू गेली ४७ वर्षे अविरत विद्यादानाचे बहुमोल करीत आहे.परांजपे विद्यालय हि वास्तू अतिशय भव्य व प्रशस्त असून चैतन्यमय आहे. पुरेसा प्रकाश, हवा व भव्य प्रांगण यांनी परिपूर्ण आहे.इमारतीची बांधणी इंग्रजी C या अद्याक्षराप्रमाणे असून त्यात २४ वर्गखोल्या अध्ययन- अध्यापनाकरिता उपलब्ध आहेत.तसेच विविध उपक्रम राबविण्याकरिता संगणक कक्ष, गृहविज्ञान कक्ष, प्रयोग कक्ष, चित्रकला कक्ष, गणित दालन, दृक-श्राव्य कक्ष, जिम, सभागृह अशा आधुनिक सोयीनी परिपूर्ण अशी विद्यालयाची रचना आहे.पूर्वी हि इमारत २ मजल्यांचीच होती परंतु १९९४-९५ साली या इमारतीवर एक मजला वाढविण्यात आला.वेळोवेळी या इमारतीची डागडुजी करून इमारतीची आकर्षकता वाढविली जाते.

ग्रंथालय :-  

शाळेचे स्वतंत्र ग्रंथालय उपलब्ध असून त्या करिता ग्रंथपालाची सोय केली आहे. तसेच अनेक विषयाचे सर्वांगीण ज्ञान देणारी अनेक पुस्तके उपलब्ध असून त्यासाठी स्वतंत्र कपाटांची सोय केलेली आहे. तसेच संगणकावर या सर्व पुस्तकांची नोंद ठेवली जाते. ग्रंथालयात एकूण ९०००

पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयात जाऊन वाचन करता यावे म्हणून विद्यार्थांना बसवण्यसाठी टेबल व खुर्चा उपलब्ध आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध आहेत.

 

 

प्रयोग कक्ष :-

विज्ञान विषयाचे प्रात्याक्षिक करण्याकरीता शाळेत भव्य असा प्रयोग कक्ष उपलब्ध आहे. त्यात एकाचवेळी५० ते ६० विद्यार्थी प्रयोग करू शकतील अशी सोय उपलब्ध आहे. प्रयोगकरिता लागणारे सर्व साहित्य व प्रोजेक्टरची सोय उपलब्ध आहे. प्रयोग प्रात्यक्षिक करून दाखवण्याकरिता लॅब असिस्टंट ची सोय आहे. कपाटे , मॉडेल , तक्ते यांनी सुसज्ज अशी प्रयोग कक्षा असून आता ती आधुनिक सोयीनी सुसज्ज करण्यात येत आहे.

क्रीडांगण :-

शाळेभोवती प्रशस्त असे क्रीडांगण उपलब्ध आहे त्यामुळे विद्यार्थांच्या क्रीडां – नैपुण्याच्या विकासाकरिता उत्तम सोय आहे. तसेच कबड्डी - खोखो - लंगडी - व्हॅालीबॉल –फुटबॉल असे अनेक खेळ क्रीडांगणावर खेळले जातात.

क्रीडांगणावर दिव्यांची सोय करण्यात आली आहे. वेळोवेळी पाणी मारून क्रीडांगणाची देखभाल घेतली जाते. नेट्स , पोल , डंबेल्स , लेझीम , व्हॉल्ट अशी अनेक क्रीडांसाहित्य शाळेत उपलब्ध आहेत तसेच वांरवार त्यांची प्रात्यक्षिके

घेतली जातात. विविध शालेय स्पर्धा , आंतरशालेय स्पर्धा – सामने , खेळे येथे आयोजित केले जातात. तसेच क्रीडांमहोत्सव , आंतरवर्गीय सामने , वार्षिकोस्तव या कार्यक्रमांकरिता या क्रीडांगणचा यथोचित वापर केला जातो.

गुहविज्ञान कक्ष :-

विद्यालयात विद्यार्थांच्या पाककलेस प्राधान्य देण्याकरिता व त्यांची प्रात्यक्षिके करण्याकरीता भव्य अशी पाककला कक्षा उपलब्ध आहे. त्यात गॅस ,ओव्हन , फ्रिज अशा अनेक आधुनिक सोयी उपलब्ध आहेत. पाककलेसाठी लागणारी सर्व भांडी , मिक्सर साहित्य उपलब्ध आहे. तसेच पाण्याची सोय ही आहे.

गणित दालन :-

विद्यालयातील विद्यार्थांची गणिताची आवड लक्षात घेऊन त्यात भर घालण्याचा दुष्टीकोनातून अदयावत गणित प्रात्यक्षिक कक्ष उभारण्यात आला आहे हे गणित दालन म्हणजे सौ. कर्वे बाईंच्या अथक परिश्रमाचे फलित होय. या कक्षेत विद्यार्थांना गणित प्रयोगाच्या तासाला नेऊन गणितातील प्रात्याक्षिकांव्दारे गणित सारखा क्लिष्ट विषय सुलभ करून शिकवला जातो. विद्यार्थांना विविध गणित तज्ञांची ओळख होण्याकरिता त्या तज्ञांची चित्रे व माहिती दर्शनीय भागी लावण्यात आली आहे. विविध गणिती खेळ व प्रात्यक्षिके यामुळे गणित विषय सुलभ करणे व विद्यार्थांची विषयातील अभिरुची निर्माण करणे व वाढवणे यासाठी आमचे शिक्षक प्रयत्नशील असतात.

द्रृक - श्राव्य कक्ष(A.V.Room):-

विद्यार्थांची ज्ञानलालसा तृप्त करण्याकरीता व त्यांना आधुनिकतेशी जोडण्याकरिता शाळेत द्रृक - श्राव्य कक्षा तयार करण्यात आली आहे. त्यात विद्यार्थांना विविध विषयांवरील सिडी , प्रोग्रॅम दाखवले जातात आमचे शिक्षक P.P.T. व्दारे अनेक संबोध स्पष्ट करण्याचा यथोचित प्रयत्न करतात.

 

संगणक कक्ष :-

आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाकरीता शाळेत संगणक कक्ष उपलब्ध आहे. विद्यार्थांना संगणक प्रात्याक्षिके करता यावीत म्हणून शाळेत ३० संगणक उपलब्ध आहेत व २ प्रिंटर आहेत तसेच ही कक्षा वातानुकुलित आहे. तसेच ओव्हर हेड प्रोजेक्टरची ही सोय आहे. त्यामुळे या कक्षेचा उपयोग शिक्षकांची प्रशिक्षणे , परिसंवाद ,चर्चा या कार्यक्रमांकरीता ही केला जातो.


जीम :-

विद्यालयात विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या आरोग्यचा ही विकास केला जातो. त्याकरीता शाळेत जीम उपलब्ध असून विद्यार्थांना योगा – शा.शि च्या तासाला तेथे नेऊन अनेक व्यायाम प्रकार करून घेतले जातात येथे अनेक उपकरणे उपलब्ध आहेत. तसेच शिक्षकांनी ही सोय उपलब्ध आहे. अशाप्रकारे ज्ञानार्जना बरोबरच आरोग्य रक्षण ही केले जाते. यासाठी माजी विद्यार्थी संघाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

 

सभागृह :-

शाळेला भव्य व प्रशस्त असे सभागृह असून त्यात पुरेसे पंखे व दिवे उपलब्ध आहेत. स्टेजची ही सोय आहे. खुर्च्या,सतरंज्या , टेबल या सोयींनी हे सभागृह परिपूर्ण असल्याने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , भाषणे , व्याख्याने , परिसंवाद , चर्चासत्रे येथे आयोजित केले जातात .

सध्या परांजपे विद्यालयात शिकत असलेले एकूण विद्यार्थी ६९० असून एकूण २४ वर्गखोल्या उपलब्ध आहेत.

परांजपे विद्यालया तर्फे १० वीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याकरीता विविध विषयांवरीलतज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने वेळोवेळी आयोजित केली जातात.