४५ वी टिळक ट्रॅाफी आंतरशालेय क्रीडास्पर्धा
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन तर्फे २० नोव्हेंबर २०२२ ला पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या मैदानावर टिळक ट्रॉफी या आंतरशालेय क्रीडासामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे हे ४५ वे वर्ष होते.७० शाळांतील एकूण ८४० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या क्रीडाप्रकारांचे एकूण ७४ सामने मोठया उत्साहात खेळवण्यात आले. त्याचा निकाल खालीलप्रमाणे असून सर्व विजेते आणि उपविजेते संघाचे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन तर्फे मनःपूर्वक अभिनंदन!





