पार्ले टिळकच्या माजी विद्यार्थ्याचा सन्मान
प्रसिद्ध वेशभूषाकार नचिकेत बर्वे यांना ’तान्हाजी : द अनसंग वॉरिअर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी,
३० सप्टेंबरला दिल्लीत झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
३० सप्टेंबरला दिल्लीत झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
बर्वे यांनी २००७ साली स्वतःचे “फॅशन लेबल” सुरु केले. अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा, क्रिती सनन आदी नामवंत कलाकार त्यांच्या ‘कलेक्शन’ चे ग्राहक आहेत.
‘कट्यार काळजात घुसली’ आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटांसाठी त्यांना राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
’तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा त्यांनी वेशभूषा केलेला पहिलाच हिंदी चित्रपट आहे. आगामी ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटासाठीही त्यांनी वेशभूषा केली आहे.
विशेष आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे श्री नचिकेत बर्वे हे पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाचे माजी विद्यार्थी असून पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन परिवारातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन !

