श्रुती कानिटकर, हिला यावर्षीचा संस्कृत विभागातील “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर

श्रुती कानिटकर, हिला यावर्षीचा संस्कृत विभागातील “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर
सर्वांना सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या पार्ले टिळक विद्यालय, इंग्रजी माध्यमाची माजी विद्यार्थिनी, प्रतिभाशालिनी श्रुती कानिटकर, हिला यावर्षीचा संस्कृत विभागातील “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर झाला आहे.
गेल्याच वर्षी “श्रीमतीचरितम्” नावाचे, राधेच्या जीवनावरचे तिचे महाकाव्य प्रकाशित झाले. या महाकाव्याच्या रचनेसाठी तिला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 💐💐

अतिशय लहान वयात असा गौरव प्राप्त होणे ही श्रुतीसाठी, संस्कृत विभागासाठी आणि आपल्या शाळेसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. २०१२ साली पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यामातून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर श्रुती कानिटकरने रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयातून २०१७ यावर्षी संस्कृत विषयातून बीए ही पदवी प्राप्त केली. श्रुती सध्या आय आय टी पवई येथून संस्कृत या विषयात पुढील संशोधन पूर्ण करत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.