बलशाली भारत होवो भाग५-कर्नल अमित दळवी (निवृत्त) संचालक सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था,औरंगाबाद

बलशाली भारत होवो भाग५-कर्नल अमित दळवी (निवृत्त) संचालक सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था,औरंगाबाद

महाराष्ट्र शासनाची औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था दहावी नंतर विद्यार्थ्यांची NDA सारख्या संस्थांच्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेते.पा.टि.वि.मराठी शाळेतील अनेक माजी विद्यार्थी शालान्त परीक्षेनंतर या संस्थेत शिकले आणि तिथून त्यांनी सैन्यदलात प्रवेश करून उत्तम कामगिरी बजावली. तर त्यातील काही जण सैन्यदलात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत; गेले तीन वर्षे कर्नल अमित राजेंद्र दळवी (निवृत्त) हे संचालक म्हणून या संस्थेचे प्रमुख पद भूषवत आहेत आणि ते पा.टि.वि.मराठी शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. ‘बलशाली भारत होवो ‘ या मालिकेच्या पाचव्या भागात कर्नल अमित राजेंद्र दळवी यांना आपण भेटणार आहोत. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना सैन्यदलात प्रवेश करण्यासाठी काय तयारी करता येते याचे मार्गदर्शन मिळणार आहे. रविवार, दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता पुढील लिंकवर हा कार्यक्रम उपलब्ध असेल.