“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम ” वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन. हा आनंद वर्ग असेल. यात सुभाषिते ,श्लोक,संभाषण इत्यादी द्वारा संस्कृत भाषेची ओळख करून दिली जाईल. कुठेही व्याकरणाची क्लिष्टता नाही. आठवड्यातून फक्त १५ मिनिटे दर शनिवारी कुटुंबातील सर्वांसाठी, सर्वांनी एकत्र पाहण्यासारखा. सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचे वर्णन ऐश्वर्यवती संस्कृत असे आपण नेहमी ऐकतो. या कार्यक्रमाद्वारे संस्कृत भाषेच्या ह्या ऐश्वर्याचा अनुभव आपण घेऊया. ८ ऑगस्ट शनिवारी आपल्या PTVA YouTube चॅनेल वर या कार्यक्रमाचा पहिला भाग पाहायला विसरू नका .