पार्ले टिळक विद्यालय आयसीएसईच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी अर्चित डोंगरे याचे अभूतपूर्व यश!💐🏅

पार्ले टिळक विद्यालय आयसीएसईच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी अर्चित डोंगरे याचे अभूतपूर्व यश!💐🏅
पार्ले टिळक विद्यालय आयसीएसईचा माजी विद्यार्थी अर्चित डोंगरे याने यूपीएससी 2024 च्या अंतिम परीक्षेत संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक मिळवला आहे. अर्चित २०१५ साली पार्ले टिळक विद्यालय आयसीएसई मधून १०वी उत्तीर्णझाला होता. त्याचे हे यश हे त्याच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे.
अर्चितच्या या यशाचा पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन परिवाराला सार्थ अभिमान वाटतो आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्रीमती अर्णवाज भगत यांनी सांगितले की, शाळेत असताना अर्चित हा अभ्यासू आणि जबाबदारीची जाणीव असलेला विद्यार्थी होता. शिक्षकांनीही सर्वांगीण गुणवत्तेसाठी अर्चितचे कौतुक केले आहे.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन चे संचालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थीमित्र अर्चितचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहेत आणि त्याच्या देशसेवेच्या प्रवासाला यश मिळो, हीच शुभेच्छा देत आहेत.

मनःपूर्वक अभिनंदन, अर्चित!!