भावपूर्ण श्रद्धांजली
‘पार्ले टिळक विद्यालया’च्या (मराठी शाळा) माजी मुख्याध्यापिका श्रीमती मालविका माधव वाटवे बाई ह्यांना दि. १३/०९/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने देवाज्ञा झाली.
सहस्रबुद्धे सरांच्या निधनानंतर एप्रिल १९९२ पासून बाई शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. शाळेच्या व्यवस्थापनात, शिस्तीत कुठेही उणेपणा येऊ न देण्याचे अवघड काम वाटवे बाईंनी धडाडीने व कौशल्याने केले. अभ्यासपूरक व अभ्यासेतर विविध योजनांची मोलाची भर विद्यालयाच्या कार्यात घातली. गणित व विज्ञान या विषयांच्या त्यांच्या अध्यापनाचा लाभ विद्यार्थ्यांना झाला. संगणक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याची ओळख शिक्षक व विद्यार्थ्यांना करून देण्यात वाटवे बाईंचा सिंहाचा वाटा होता. मा. राष्ट्रपतींच्या हस्ते वाटवे बाईंना “आदर्श शिक्षिका ” राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला होता.
फेब्रुवारी १९९७ ला त्या सेवानिवृत्त झाल्या.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली