विद्यावाचस्पती – पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन चा अभिनव उपक्रम

विद्यावाचस्पती – पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा अभिनव उपक्रम 

स्वतःचे व्यावसायिक नि प्रापंचिक व्याप सांभाळून Ph.D. सारखी अवघड पदवी मिळवणे हे फार कठीण असते. म्हणूनच असे गुरुजन सर्वांच्या आदर आणि कौतुकास पात्र ठरतात. परंतु त्यांचा अभ्यास प्रबंध पुस्तकात बंदीस्त राहतो. तो समाजा पर्यंत पोहचत नाही. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या महाविद्यालयातील कित्येक प्राध्यापक आणि शाळांमधील शिक्षक विद्यादाना बरोबरच स्वतः ज्ञानग्रहणही करत असतात. विद्या वाचस्पती या कार्यक्रमातून Ph.D. प्राप्त केलेली सर्व विद्वान मंडळी आपल्या भेटीला येत आहेत. त्यांनी ज्या विषयाचा अभ्यास करून Ph.D. मिळवली तो विषय सोप्या भाषेत ते सर्वांना उलगडून दाखवणार आहेत. त्यांचा अभ्यास आता केवळ त्यांनी लिहिलेल्या प्रबंधात बंदिस्त राहणार नाही, आता तो विद्यावाचस्पती या कार्यक्रमा द्वारे सर्वांपर्यंत पोहचणार आहे. त्यातून विविध विषयांची तोंडओळख करून घेण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ विजयादशमी, मंगळवार, दि.२४ ऑक्टोबर २३ या रोजी सकाळी ९ वाजता PTVA YouTube Channel वर होत आहे. पहिला भाग- सादरकर्त्या -मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पेडणेकर. हा भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. विषयासंबधी आपल्या काही सूचना, प्रश्न आपण व्हिडीओच्या शेवटी कॉमेंट मध्ये विचारू शकता.पाहायला विसरू नका.