दुःखद निधन -प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके (५जून १९६२-३ॲाक्टो.२०२३)
म.ल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके यांचे आज ३ ॲाक्टो २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी, मुलगा, सून, मुलगी , जावई असा परिवार आहे.
डॅा. डोके २२ जून १९८७ रोजी डहाणूकर महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यांनी स्टॅटिस्टिक्स विषयात M.Sc. पदवी प्राप्त केली होती. पुढे २०१७ मधे त्यांनी याच विषयात डॉक्टरेट (Ph.D.) मिळवली. २२ सप्टें२०१८ मध्ये म.ल.डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर २२सप्टें२०२३ रोजी प्राचार्यपदी त्यांची अजून एका टर्मसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. सरळ स्वभाव आणि परोपकारी वृत्तीमुळे डोकेसर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रिय होते. विद्यापीठातही त्यांच्या प्रशासकीय ज्ञानामुळे त्यांना नावाजण्यात येत असे. संत साहित्यातील रूचीमुळे ते वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. शिस्तप्रिय तरीही संवेदनशील, गरजू विद्यार्थ्यां विषयी तळमळ असणारे आणि त्यांना सतत मदत करणारे प्राचार्य म्हणून. डॅा. डोके सर सर्वांच्या कायम स्मरणात राहतील. म.ल.डहाणूकर महाविद्यालय आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन परिवारातर्फे डॅा. ज्ञानेश्वर डोके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.