पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या १९७५ च्या बॅचचे माजी विद्यार्थी प्रोफेसर निखिल धुरंधर यांना पॉल व्हिटफिल्ड हॉर्न डिस्टींग्विश्ड प्रोफेसरशिप प्रदान
पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या १९७५ च्या बॅचचे माजी विद्यार्थी प्रोफेसर निखिल धुरंधर यांना पॉल व्हिटफिल्ड हॉर्न डिस्टींग्विश्ड प्रोफेसरशिप प्रदान करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातला हा अतिशय प्रतिष्ठेचा सन्मान आहे.
प्रोफेसर निखिल धुरंधर यांना टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये फॅकल्टी सदस्याला मिळू शकणार्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले असून , त्यांना टेक्सास टेक सिस्टम बोर्ड ऑफ रीजेंट्सने एकमताने “हॉर्न प्रोफेसर” म्हणून मान्यता दिली आहे.
प्रोफेसर निखिल धुरंधर, यांनी रसायनशास्त्रात पदवी, पोषण आणि अन्न विज्ञानात पदव्युत्तर पदवी आणि पोषण आणि नैदानिक न्युट्रिशनमध्ये पोस्टडॉक्टरल पदवी मिळवली असून , २०१४ मध्ये ते न्यूट्रिशनल सायन्सेस विभागाचे अध्यक्ष पदी रुजू झाले होते . धुरंधर यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतात लठ्ठपणा व्यवस्थापन विषयक तीन कार्यक्रम आणि युनायटेड स्टेट्समध्ये आणखी तीन कार्यक्रम राबवले आहेत.
प्रोफेसर निखिल धुरंधर यांनी आतापर्यंत १७५ लेख//शोधनिबंध लिहिले आहेत . प्रोफेसर निखिल धुरंधर यांचे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन ! त्यांच्या हातून या क्षेत्रात यापुढेही भरीव कामगिरी घडो. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.