PTVA Schools Newsletter

                                                       PTVA Schools Newsletter Released 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. २६ जाने २०२३ या शुभदिनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांचे एक सामायिक वार्तापत्र PTVA Schools Newsletter प्रसिद्ध करण्यात आले. शाळेत सुरु असलेले विविध उपक्रम, विद्यार्थी व शिक्षकांची लक्षणीय कामगिरी याविषयी दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या या वार्तापत्रातून आपल्याला ही माहिती छायाचित्रांसह वाचायला मिळेल. भविष्यात शाळेतील विद्यार्थ्यांनीच सर्व उपक्रमाचे वार्तांकन करावे हा प्रयत्न असणार आहे. यातून मुलांचे लेखन कौशल्य विकसित होईल. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, लिहिलेले लेख यांनाही जागेच्या उपलब्धी नुसार या वार्तापत्रात स्थान मिळेल.

या सामायिक व्यासपीठाद्वारे पाटिविअच्या सर्व शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विचारांचे आदान प्रदान होण्यास चालना मिळेल. सर्व शाळांमध्ये एकता आणि संघभावना वाढीस लागेल.

यासर्वांहुन महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना आभासी माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी दृक्श्राव्य माध्यमांपेक्षा अधिक भर पुस्तकांचे वाचन करण्यावर दिला पाहिजे. या वार्तापत्रातून विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा मिळेल, लेखनासाठी ते उद्युक्त व्हावेत असा प्रयत्न आहे. पाटिविअच्या सर्व शाळांमध्ये आज सकाळी झेंडावंदन झाल्यानंतर या वार्तापत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.या वर्तापत्राच्या संपादक संस्थेच्या मुख्य समन्वयक जान्हवी खांडेकर आहेत, तर मांडणी आणि छपाई ठाणेवैभव आणि आर्ट 65 चे निखिल आणि जुईली बल्लाळ हे करत आहेत.