स्वातंत्र्यदिनाचा अनोखा सोहळा..
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत असताना मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन या शैक्षणिक संस्थेत एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
पाटिविअच्या पाच शाळांमधील कलाशिक्षकांनी मिळून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनी ७५ फूट कॅनव्हास ७५ मिनिटात रंगवला.
१५ ॲागस्टला सकाळी शाळांमधील झेंडावंदन झाल्यानंतर ठीक ९ वाजता कलाशिक्षकांनी ७५ फूट कॅनव्हासवर चित्रे रंगवायला सुरूवात केली. आणि पुढच्या ७५ मिनिटे न थांबतां ठीक १०.१५ वाजता सुंदर चित्र पूर्ण केले.
यामधे ८ कलाशिक्षक प्रमुख होते त्यांना इतर काही शिक्षकांनी मदत केली. पार्ले टिळक विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील तळमजल्यावरील सभागृहात यासाठी ७५ फूट लांब आणि ५ फूट उंच कॅनवास लावण्यात आला होता. यांवर स्वातंत्र्य लढ्यांतील क्रांतिकारक, भारतमाता चितारण्यात आले. तसेच भारताने गेल्या ७५ वर्षात विज्ञान , तंत्रज्ञान, शिक्षण , वाहतूक अश्या विविध क्षेत्रात केलेली प्रगती निरनिराळ्या प्रतीकांतून दाखवण्यात आली आहे. याबरोबरच शेजारील हॅालमधे पाटिविअच्या शाळांमधील कला शिक्षकांनी ॲक्रेलिक रंगांत चितारलेल्या पेंटींग्जचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रसंगी सर्व कलाशिक्षकांचा सत्कार आणि प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री सुहास बहुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुलकरांनी अवघ्या काही मिनिटात एक अतिशय सुंदर निसर्गचत्र सर्वांसमक्ष काढून चित्रकला शिक्षकांना प्रात्यक्षिकातून बहुमोल मार्गदर्शन केले.
पुढील आठवडाभर पाटिविअच्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्याना हे प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमाची संकल्पना आणि आखणी पाटिविअच्या मुख्य समन्वयक जान्हवी खांडेकर आणि पाटिविअचे सहकार्यवाह श्री. हेमंत भाटवडेकर यांची असून सर्व कलाशिक्षकांनी यासाठी खूप मेहनत घेतली.
या उपक्रमासाठी शाळांमधील सर्व शिक्षक आणि पाटिविअच्या संचालक मंडळाचे पदाधिकारी श्री. गानू, श्री. पेठे, श्री. धुरंधर आणि डॅा. दांडेकर उपस्थित होते.
Video
Photos











