नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन
पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी संस्थेने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक “श्रीमती प्राची साठे” यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी शैक्षणिक धोरण ज्ञानरचना वाद आणि वर्तनवादावर कसे आधारित आहे यांवर शिक्षकांशी संवाद साधला.
नवीन शैक्षणिक धोरणाची गरज ते कसे ज्ञानरचनावादाबरोबरच विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि क्रियाशीलता यावर आधारित असणार आहे याविषयी माहिती दिली.
तसेच या धोरणात विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, व्यावसायिक अभ्यासक्रमाची गरज, अनुभवातून शिक्षण इत्यादी बाबींवर कसा भर दिला आहे हे देखील अतिशय सोप्या भाषेत, रंजक पद्धतीने, शिक्षकांना छोटे छोटे प्रश्न विचारून, संवादातून उत्तम पद्धतीने सांगितले . विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याऐवजी त्यांना ज्ञान घेण्यास उद्युक्त करणे, त्यांच्या बुद्धीला चालना देणे गरजेचे आहे यावर भर देणे आवश्यक आहे, पाठयविषयांचा परस्परसंबंध स्थापन करता येणे, परस्पर सहकार्यातून, एकमेकांच्या कौशल्याचा उपयोग करून वर्गाला दिलेले एखादे कार्य पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना सवय लावणे इत्यादी गोष्टी शिक्षक कशा प्रकारे घेऊ शकतात याचेही मार्गदर्शन केले गेले.

एकूण कार्यशाळेतून सर्व शिक्षकांना नवीन शैक्षणिक धौरणाविषयी तज्ञांकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.