“बलशाली भारत होवो”

“बलशाली भारत होवो”

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन व पार्ले टिळक विद्यालय ह्या मराठी शाळेच्या शताब्दी वर्षा निमित्त “बलशाली भारत होवो” हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे.
पा. टि. वि. अ. परिवारातील शाळा आणि महाविद्यालयांचे अनेक माजी विद्यार्थी सैन्यदलाशी संबंधित असून विविध प्रकारे देशसेवेचे व्रत उत्तमपणे निभावत आहेत.
अश्या काही निवडक माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून ‘बलशाली भारत होवो’ या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. संरक्षण दलातील त्यांचे अनुभव संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना ऐकायला मिळतील, यातून संरक्षण दलाविषयी माहिती मिळेल आणि सैन्यदलात सहभागी होऊन देशसेवा करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून अधिक प्रभावी रित्या मिळेल .
याशिवाय संरक्षणदलातील करियरच्या विविध संधी, त्यासाठी काय पात्रता असते, प्रवेश प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया कशी असते याविषयी सर्व मार्गदर्शन या कार्यक्रमातून केले जाईल. अश्याप्रकारे सुमारे ८ ते १० भागांची ही पाक्षिक मालिका संस्थेच्या यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित केली जाईल. आपल्या संस्थेच्या शाळांमधील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम संरक्षण दलात जाण्यासाठी प्रेरणा देईल आणि मार्गदर्शनही करेल .
ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ शताब्दी वर्षातील विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर होतआहे. पा.टि.वि.मराठी शाळेचे माजी विद्यार्थी,ज्यांनी भारतीय संरक्षण दलाच्या हवाईदलाचे सर्वोच्च स्थान भूषविले आहे, ते माजी हवाईदल प्रमुख मा. श्री. प्रदीप नाईक यांच्याशी संवाद साधून या मालिकेचे पहिले पुष्प गुंफले जाईल. संस्थेच्या यूट्यूब वाहिनीवर १५ॲाक्टोबर२०२१ सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
www.youtube.com/parletilakvidayalayaassociation