पार्ले टिळकच्या शिक्षिकांची ‘अभिरूप संसद’

पार्ले टिळकच्या शिक्षिकांची ‘अभिरूप संसद’
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या वतीने ‘अभिरूप संसद’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाटिविअच्या पाच शाळांतील पंधरा शिक्षिका यात सहभागी होत आहेत. आवश्यक ती सर्व काळजी घेऊन, प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात आणि त्याचवेळी शालेय शिक्षणात यापुढे मर्यादित स्वरूपात ॲानलाईन माध्यमाचा समावेश करण्यात यावा अशी विनंती या कार्यक्रमाद्वारे शासनाला करण्यात येत आहे. या निमित्ताने ॲानलाईन शिक्षण पद्धतीवर सांगोपांग चर्चा होणार आहे. गेले दीड वर्षे ॲानलाईन माध्यमातून शिक्षण चालू आहे. परंतु आता प्रत्यक्ष शाळा सुरू करून शालेय अभ्यासक्रमातील काही भाग यापुढेही ॲानलाईन माध्यमातून शिकवला जावा. कोविडकाळात शिक्षणक्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापना साठी ॲानलाईन माध्यम उपयुक्त ठरले. या माध्यमामुळे शिक्षक आणि विद्यार्थी तंत्रस्नेही बनले. तसेच मर्यादित स्वरूपात हे माध्यम वापरल्यास वाहतूकीसारख्या इतरही व्यवस्थांवरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल. परंतु प्रचलित शालेय शिक्षण पद्धतीला ॲानलाईन माध्यम हा पर्याय नाही. ह्या माध्यमाचे दुष्परिणामही अनेक आहेत. तेव्हा दोन्हीचा समतोल साधत प्रत्यक्ष शालेय शिक्षणाला मर्यादित स्वरूपात ॲानलाईन माध्यमाची जोड द्यावी असे प्रतिपादन या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दि.१५ॲागस्ट २०२१. रोजी सकाळी ९ वाजता पाटिविअच्या यूट्यूब वाहिनीवरून प्रक्षेपित केला जाणार आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक सर्वांसाठीच हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.