क्षण कृतज्ञतेचा..क्षण कृतार्थतेचा..!


क्षण कृतज्ञतेचा..क्षण कृतार्थतेचा..!

आपण जाणताच पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे हे शताब्दी वर्ष. या वर्षी २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंती हा दुग्धशर्करा योग जमून आला होता. या सुयोग्य दिनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने आपल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयातील सर्व गुरूजनांचा तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शतकमहोत्सवी स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. संस्थेच्या १०० वर्षांच्या वाटचालीतील कृतार्थतेच्या या क्षणी संस्थाचालकांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण क्षणाचे भाग्यवान साक्षीदार असणाऱ्या सर्वांसाठीच हा दिवस अविस्मरणीय ठरला.