पा.टि.वि.अ.चा “ज्ञानफुलोरा”

                   पा.टि.वि.अ.चा “ज्ञानफुलोरा”.
               प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा प्रजासत्ताकदिन हा विशेष असून पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांनी एकत्र येऊन तो साजरा केला.. यावर्षी १०० वर्षे पूर्ण करत असलेल्या पार्ले टिळक मराठी शाळेच्या मैदानात पा.टि.वि.अ.च्या पाचही शाळांमधील सर्व शिक्षक ध्वजवंदन करून संचलनात सहभागी झाले होते. याप्रसंगी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि संचालक मंडळ पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण खात्याने दिलेली हरित शपथ घेतली.
मागील वर्षी सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी मैदानावर PTVA 100 अशी रचना केली होती.यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येऊन ‘ज्ञानफुलोरा’ या संकल्पनेवर आधारित १०० प्रकारची सुमारे ५००० नैसर्गिक फुले आणि ८०० रोपांचा वापर करून शतक महोत्सवी वर्ष सूचित करणारी भव्य रचना केली आहे. मागील दोन महिन्यांपासून त्याची तयारी चालू आहे. ही रचना सर्व शाळांच्या एकात्मकतेचे प्रतीक आहे.
आपल्याला दिनांक २६ जानेवारी २०२१ दुपारी ४ ते ८ या वेळेत आणि २७ जानेवारी स. ८ ते ११ आणि दु.४ ते ८ वाजेपर्यंत ज्ञानफुलोरा पाहता येईल.
स्थळ – पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचे पटांगण.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन

Photos