शतकमहोत्सवी वर्षानिमित्त पा टि वि अ ने माजी विद्यार्थ्यांसाठी ऑन लाईन माध्यमातून आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला . सर्व स्पर्धकांना ऑन लाईन सहभाग इ प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध अर्कचित्रकार मा. श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी केले होते. गेल्या आठवड्यात पाटिवि मराठी माध्यमिक विभागाच्या चित्रकलाकक्षात आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात प्रभुदेसाईंच्या हस्ते सर्व विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी प्रा. स्वाती वाघ यांनी प्रभुदेसाई यांच्याशी संवाद साधला. प्रभुदेसाई यांनी आपल्या जीवनातील अनेक गंमतीशीर प्रसंग सांगून उपस्थितांची मने जिंकली.