५ सप्टेंबर २०२० ! – शिक्षक दिन कृतज्ञता सोहळा
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतक महोत्सवी वर्षातील हा शिक्षकदिन, शिक्षक कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर स्वतः केंद्रीय मंत्री मा. खा. श्री प्रकाशजी जावडेकर आपल्या संस्थेतील शिक्षकांना आणि विदयार्थ्यांना एका खास आभासी कार्यक्रमात सम्बोधीत करतील. नवीन शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीमध्ये जावडेकरांचे मोठे योगदान आहे. या विषयावर जावडेकरांचे मार्गदर्शनाची सुवर्णसंधी आपल्याला मिळतेय. हा कार्यक्रम ऑनलाईन माध्यमांवर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.