पा. टि. वि. अ.(PTVA) च्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन
आपले सगळेच शिक्षक आपल्याला आठवतात असं नाही . पण काही शिक्षक मात्र कायम स्मरणात राहिलेले असतात. कधी त्यांची एखादी लकब आठवत असते तर कधी एखादी सवय. कधी त्यांच्या बाबत घडलेला किस्सा. तुमच्या अश्याच आठवणी आता तुम्ही पाठवा आपल्या ॲपवर. हो आता ॲपवर तुम्ही पोस्ट करू शकता आणि इतरांच्या पोस्टस तुम्हाला दिसणार देखील आहेत. या सुविधेची सुरूवात आपण आपल्या गुरूंच्या अर्थात शिक्षकांच्या स्मरणाने करणार आहोत. आजच तुमच्या शिक्षकांविषयीची वर लिहीले आहे त्याप्रमाणे एखादी आठवण नेमक्याशब्दात लिहा आणि PTVA ॲपवर पोस्ट करा. त्यासाठी ॲपच्या होम पेजवर खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात अधिक + चे चिन्ह दिले आहे ते दाबा आणि आपली आठवण पाठवून द्या. तुमच्या आठवणी / फोटो तुमचे मित्र आणि PTVA ॲपवरचे इतर सभासद पाहतील शिवाय तुमच्या काही आठवणीतील शिक्षकांना व्हर्च्युअली भेटण्याची संधी मिळवून देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. चला तर मग PTVA ॲपवर पोस्ट पाठवा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा.
कृपया लक्षात घ्या PTVA ॲप सध्यातरी केवळ PTVA च्या माजी विद्यार्थ्यांसाठीच आहे.
