पार्ले टिळक विद्यालयातील भूगोल दालन
” निसर्गातील प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी अद्भुत दडलेले असते ”
– अरिस्टोटल
मुलांनो शाळेचा बंद दरवाजा कधी एकदा उघडतोय ह्याची तुम्ही आता अगदी आतुरतेने वाट पाहत असाल ना ? हं , तर त्याबरोबरच आणखी एक खजिना तुम्हा सर्वांचीच वाट पाहतोय.मराठी माध्यमाच्या शाळेतील पाचव्या मजल्यावर एक अद्भुत नगरी तुम्हाला एका जादुई दुनियेत घेऊन जाणार आहे.ते आहे आपल्या सर्व विदयार्थी मित्रांसाठी तयार केलेले
” भूगोल दालन “…
आपल्या शाळेच्या शताब्दी वर्षात अनेक उपक्रम संस्थेने राबवायचे ठरवले होते.त्यामध्ये प्रामुख्याने विदयार्थ्यांच्या विविध विषयातील सर्वागीण प्रगतीसाठी अनेक दालने बनवायचा संकल्प केला होता.त्यानुसार चित्रकला कक्ष ,समुपदेशन कक्ष ,गणित कक्ष आधीच तयार झाले.
ह्या भूगोल दालनात पाऊल ठेवल्यावर खोलीतील आणि छतावरील रंगसंगती तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल.संपूर्ण खगोलाचा नजारा , धूमकेतू ,आकाशगंगा तुमचे लक्ष वेधून घेतील.भिंतीवर लावलेल्या मोठ्या स्क्रीन वर तुम्ही त्या विषयाशी संबंधित माहितीपट पाहू शकाल.इथली प्रकाश योजना आणि ध्वनी योजनाही तुम्हाला एक वेगळा फील देईल.
भिंतीवर लावलेले विविध नकाशे ,टेबलावर मांडलेली मॉडेल्स तुम्हाला ह्या विषयाची माहिती पुरावतीलच,पण हा निरस वाटणारा विषय त्याविषयी गोडीही निर्माण करेल.
जलचक्राचे बनवलेले मॉडेल तुम्हाला सृष्टीतील हि साखळी कशी चालते ह्याचा परिचय करून देईल.
आणि हो तुम्ही शिक्षकाच्या मदतीने ,तुमच्या कल्पकतेला वाव देऊन विविध नवीन मॉडेल बनवू शकता.त्यासाठी संगणक ठेवले आहेत ,त्या वरून हवी ती माहिती तुमच्या प्रोजेक्ट साठी तुम्हाला शोधता येईल.
येणारा काळ हा डिजिटल क्रांतीचा असेल ,त्यानुसार आधीच दूरदृष्टीने इथे योजना आखली आहे. बदलत्या प्रवाहाबरोबर शाळा हि नवनवीन बदल घडवीत भक्कम पायावर उभी आहे ,ह्याचे ठळक उदाहरण म्हणून ह्या दालनाकडे नक्कीच बघता येईल..मग लॉक डाऊन संपला आणि शाळा पुन्हा सुरु झाली कि येणार ना मला भेट द्यायला ?
— स्नेहा
@SnehaBhatawadekar


