पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आयोजित भाषा विश्व प्रदर्शन
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या माध्यमातून मराठी , हिंदी, इंग्रजी , संस्कृत या भाषांचा जागर करणारे भाषा विश्व हे प्रदर्शन दिनांक ४ व ५ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आले होते. पार्ले टिळक असोसिएशनच्या सर्व शाळांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला होता.
भाषेच्या उगमापासून , आरोळ्यांपासून , चित्रलिपीपासून आत्ताच्या तंत्रज्ञानातील भाषेपर्यंतचा प्रवास या प्रदर्शनात उलगडला. या प्रदर्शनाचे उदघाटन निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. भाषेचा उगम, भारतीय भाषा, जागतिक भाषा , संवाद माध्यम , भाषेचे खेळ, गमती , जमाती अशा विषयांवरचे कक्ष आणि विद्यार्थ्यांचे उत्तम सादरीकरण या मुळे या प्रदर्शनाची मजा उत्तम प्रकारे अनुभवता आली. या प्रदर्शनाची काही छायाचित्रे ….