सूत्रसंचालन व व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा

परांजपे विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त परांजपे विद्यालय प्राथमिक शाळेने मुंबईतील शिक्षकांसाठी ‘सूत्रसंचालन व व्यक्तीमत्व विकास’ ही कार्यशाळा आयोजित केली होती.

         या कार्यशाळेचे उदघाटन मंगळवार दि. १/१०/१९ रोजी सकाळी १०:१५ वाजता परांजपे विद्यालयाच्या सभागृहात पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या पदाधिकारी सन्माननीय श्रीमती स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पार्ले टिळक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. अनिल गानू व सहकार्यवाह सन्माननीय श्री. हेमंत भाटवडेकर उपस्थित होते.

         ही कार्यशाळा घेण्यासाठी अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त श्री. जतिन कदम व श्रीमती प्रतिभा कदम यांना आमंत्रित केले होते. या कार्यशाळेचा एकंदरीत ७५ शिक्षकांनी लाभ घेतला. मुंबईत प्रथमच सूत्रसंचालन ही कार्यशाळा घेण्यात आली होती. उपस्थित सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेचे नियोजन व विषय या संबधी चांगल्या उत्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.