शाळेची सुरवात :शतकमहोत्सव सदर क्र.3

शाळेची सुरवात : शतकमहोत्सव सदर क्र.3

जून ९, १९२१ या दिवशी पार्ले टिळक विद्यालय हि मराठी शाळा स्थापन झाली. आद्य संस्थापक श्री भिडे यांच्या बंगल्यातील खोलीमध्ये वर्ग सुरु झाले.सुरवातीला इंग्रजीचे दोन वर्ग तर मराठीचे ३ वर्ग होते.त्यावेळी पाचवी पासून पुढील इयत्ताना इंग्रजी शाळा  तर इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळेला मराठी शाळा म्हणत. मराठी शाळा पारधी यांच्या घरी भरत असे.

जून १९२१ महिन्याचा अहवाल1.शाळा लोकांस माहिती व्हावी या हेतूने लोकमान्य पत्रात ३ वेळा जाहिरात द्यावी व १००० पर्यंत शाळेचे माहितीने भरलेली वृत्तपत्रके वाटावी असे ठरले.

वर उल्लेखल्याप्रमाणे शाळा हि दोघा संचालकांच्या घरात भरवली जात होती. असे असताना शाळेची माहिती असलेली १००० वृत्तपत्रके वाटायचे ठरवले. यावरून दिसते कि आद्य संस्थापकांनी पहिल्यापासून मोठ्या शाळेचे स्वप्न पाहिले  होते.

2.फक्त ७ मुले असताना शाळेची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अभिप्राय मजेदार आहे.

काम बरे चालले आहे. मुले शिस्तीची दिसतात.

जुलै १९२१ महिन्याचा अहवाल
जुलै या एका महिन्यात झालेला अभ्यास बघून आश्चर्य वाटते. आणि तरी शालेय तपासनीसांचा अभिप्राय ” काम बरे चालले आहे “असाच आहे.

 शाळा सुरु झाल्यावर शाळेच्या व्यवस्थापनेने पहिल्या काही महिन्यात घेतलेले निर्णय व केलेल्या सूचना   *

  1.चिटणीसाने दरमहिन्यास सभेपुढे दरमहिन्याचा मासिक अहवाल सादर करीत जावा.
  2.शाळेच्या व्यवस्थापनाने सभेमध्ये चर्चा करुन “मराठी शाळेतील मुलींस फी न घेता मोफत शिक्षण द्यावे असे ठरवले.” ही सभा १२ जून     १९२१ साली झाली होती.
 3.विलेपार्ले येथे मुलींची इंग्रजी शाळा नसल्याने पार्ले टिळक विद्यालयाच्या मुलांच्या शाखेत पालकांच्या परवानगीने दुय्यम शिक्षण घेऊ     इच्छिणार्‍या मुलींना विद्यालयात दाखल करून घ्यायची परवानगी दिली (दुय्यम म्हणजे इयत्ता पाचवींच्यापुढे)
4.मुलींनी शाळा सुरु झाल्यावर १० मिनिटांनी यावे व सुटण्यापूर्वी १० मिनिट आधी जावे.

मुलींसाठी खास घेतलेल्या या निर्णयामागे संस्थेच्या संचालकांचा मुलींच्या शिक्षणाविषयीचा उदार दृष्टिकोन दिसून येतो.