“पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर .

पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर .

                                

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे नवीन वर्ष नेहमीच उत्साहात आणि कार्यमग्नतेत सुरु होते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भव्य प्रदर्शन भरवण्यात येते. पा टि वि अ च्या पाचही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन एका विषयाची संपूर्ण माहिती देणारे प्रदर्शन भरवतात. २०१७ साली प्रथम हा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आल इतिहास याविषयावर हे पहिले प्रदर्शन भरवण्यात आले होते.

त्यानंतर करोनाची दोन वर्षे वगळता आतापर्यंत चार प्रदर्शने भरवण्यात आली. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. या वर्षी शनिवार ६ जानेवारी आणि रविवार ७ जानेवारी २०२४ ला हे प्रदर्शन भरवण्यात येईल. या कल्पक उपक्रमाची संकल्पना संस्थेचे सह कार्यवाह श्रीयुत हेमंत भाटवडेकर यांची आहे. गेली पाच वर्षे भाटवडेकर सर स्वतः प्रदर्शनाचा विषय ठरवण्यापासून ते प्रदर्शनाच्या सांगते पर्यंत प्रत्येक गोष्टीत सक्रिय सहभागी होतात, किंबहुना प्रदर्शनाच्या टीमचे ते “ Non Playing Caption” आहेत अस म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

या कार्यक्रमात मंगळवार २ जानेवारी ,२०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता पा.टि.वि.अ.च्या YouTube Channel वर पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या आय सी एस इ शाळेचे दोन विद्यार्थी पा टि वि अ ची प्रदर्शने या अनोख्या उपक्रमाविषयी सरांशी संवाद साधत आहेत. चला ऐकूयात हा माहितीपूर्ण संवाद.