मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स – ” स्मृतिगंध ” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
पार्ले टिळक विद्यालयाचे मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स च्या निवृत्त सभासदांनी निवृत्त प्राचार्य श्री अ. द. ओक यांच्या पुढाकाराने , निवृत्त प्राचार्य श्री ल. सु. भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या सक्रिय सहयोगाने माजी कर्मचाऱ्यांच्या स्नेह सम्मेलनाची अनोखी प्रथा २०१६ पासून सुरू केली आहे. या प्रथेप्रमाणे या वर्षी चे स्नेह सम्मेलन महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी व्यवस्थापन व महाविद्यालया संबंधी आठवणींना उजाळा देणाऱ्या ” स्मृतिगंध ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संस्थेचे प्रेसिडेंट श्री अनिल गानू यांच्या शुभहस्ते शिस्तीत पार पडला. त्यांनी प्रकाशनावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पी. टि व्हि. ए.(Principles, Talents, Values of human life &Achievements )या अद्याक्षरांचे प्रा. रामाणीबाईंनी लावलेले कल्पक अर्थ वाखाणून दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे ट्रेजरर व मुलुंड कॉलेज चे पालक संचालक श्री बंसी धुरंधर यांनी त्यांच्या नेहमी च्या शैलीत उपस्थितांना प्रेरणात्मक संबोधित केले. विद्यमान प्राचार्या डॉ सोनाली पेडणेकर यांनी मागील वर्षांत कॉलेज ने यु. जी. सी. कडून मिळवलेल्या स्वायत्तते चा उल्लेख करून कॉलेज ने केलेल्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडला. ” स्मृतिगंध ” या पुस्तकात संस्थेचे संचालक व विद्यमान प्राचार्या डॉ सोनाली पेडणेकर व २६ माजी सभासदांनी कॉलेज संबधी आपल्या आठवणी जागवल्या असून संपादनाची बाजू प्रा. सुहासिनी किर्तीकर व डॉ धनंजय गो. देशपांडे यांनी तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची बाजू सौ प्रभा रानडे यांनी प्रभावी पणे सांभाळली.
मुलुंड कॉलेज मधील गेल्या ५२ वर्षांतील काही घटनांचा धावता मागोवा घेण्यात आल्यामुळें याला संदर्भ ग्रंथ ही म्हणता येईल.