परांजपे विद्यालय, अंधेरी या शाळेचे १९९१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी कर्नल संदीप पेंडसे यांना विशिष्ट सेवा मेडल व्हीएसएम (VSM) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर

कर्नल संदीप पेंडसे

सर्वांना सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की परांजपे विद्यालय, अंधेरी या शाळेचे १९९१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी कर्नल संदीप पेंडसे यांना विशिष्ट सेवा मेडल व्हीएसएम (VSM) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सशस्त्र दल विभागातील ‘Distinguished service of a High order’ यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी सशस्त्र दलांसाठी विविध सन्मान आणि पुरस्कार जाहीर केले जातात.

लष्कराच्या मुख्यालयात गेल्या तीन वर्षांत कर्नल संदीप यांनी नवीन लढाऊ गणवेश निर्मितीसाठी केलेल्या महत्वाच्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळा वर्षाच्या शेवटी होईल. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो.

श्री कर्नल संदीप अ. पेंडसे यांचे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन ! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .